Wednesday, 30 January 2019

हळदी कुंकू.......

मानसिक गुलामगिरी शारीरिक गुलाम गिरीपेक्षा अधिक घातक असते. कारण त्यात आपण  गुलाम असल्याची  जानीवच होत नाही .म्हणूनच  परंपरेनी  बहाल केलेल्या  सणवारांची  चिकित्सा  न करता त्यांना रहाटगाड्यासारखे  सुरू ठेवल्यास  मानसिक गुलामगिरीचा  विळखा अधिकाधिक  घटट् होत जातो.
    हळदी कुंकवाच्या  निमित्ताने स्त्रियांनचे स्नेहवादी मिलनाचा परंपरा हे असेच लोढणे होय. मुजोर गायी बैलाच्या गळ्यातही गाव खेड्यात लाकडी ओंडक्याचे लोढणे बांधतात. परंतू ते ओझेरूपी  लोडणे लवकर  सोडता येते. मात्र स्त्रियांच्या स्त्रियांच्या मेंदूत भिनलेले खूळचट परंपरांचे लोढणे  निघाल्या शिवाय स्त्रिया स्वसन्मानाची भाषा बिलकूल करणार नाही .

हळदीकुंकू  म्हणजे  काय तर परस्परांच्या सौभाग्याला दिर्घायुष्य चिंतणे. आपल्या  बायकोचे आयुष्य वाढावे म्हणजेच ती दीर्घायुष्य व्हावी अशी कामना करायला लावणारा एकतरी सणवार या संस्कृतीत  आहे काय . नाही ना कारण त्याची पुरूषाला गरजच नाही. हे कोणी शिकवले संस्कृतीने  अशा संस्कृतीत वाढणारी म्हणूनच विज्ञानाचे शिक्षण घेऊनही  अविचारी ,रूढींवादी व स्त्रिविरोधी पुरूषी मानसिकता  तयार होते.
      म्हणूनच भाऊ हा पुरुष आपल्या बहिणीच्या नवऱ्यासाठी व बाप हा पुरुष आपल्या मुलीच्या नवऱ्यासाठी  जावयासाठी  हुंड्याची व्यवस्था करतो. हि खरेदीविक्री कोणाची होते तर  एका स्त्रीची .याचा विचार कोणताही बाप  भाऊ करीत नाही. त्यामुळे बिनबुडाच्या लोटयासारखी  स्त्रीची  अवस्था आहे. म्हणूनच तर तिचे दान केले जाते. आणि पुरुष दानशूर बनतो.
    हळदीकुंकू हे नुसतेच हळदीकुंकू नाहीतर  सांस्कृतिक गु्लामीची खरुज आहे. जिचा प्रसार प्रचार  मकरसंक्रांतीला व्यापक स्तरावर केला जातो. पण त्या खरुजेचेही जतन स्त्रिया केवळ यासाठी भक्ती भावाने करतात कारण त्याचा संबध धर्माच्या परंपरांशी लावला जातो . पण खुळचट परंपरांचा त्याग आणि परंपरांची निर्मिती ही प्रक्रिया सुरु केल्याशिवाय स्त्रियांमध्ये मेंदू नावाचा अवयव आहे असे म्हणता येणार नाही.  धर्माच्या नावावर जर स्त्री विरोधी परंपरांचा धिक्कार स्त्रिया करणार नसतील तर  नुसतीच सावित्रीमाईंची जयंती साजरी करून काय फायदा. त्यापेक्षा तर सत्यवान सावित्रीचा आदर्श घेणे चांगले. 
     परंतु तसाच एखादा तरी सत्यवान या परंपरेनी  का निर्माण होवू दिला नाही जो आपल्या बायकोसाठी एवढा व्याकूळ होतो.  दुसऱ्याच्या सांगण्यावरून  आपल्या बायकोला त्यागणारा पुरुषोत्तमही देव ठरून पुजनीय मानला जातो .तेही कमी ठरेल की काय  स्त्रियांचे कपडे पळवून त्यांना कपडे परत करण्याविषयी  विचार करायला लावणारा स्त्रीलंपट  देवपुरुष महान ठरतो. अर्थात पुरुषांनी आपल्या स्वार्थाखातर हे केले ,आणी स्त्रिया आजही नवर्याला देव मानतात दुर्दैवाने.

1 comment:

  1. 👌👍पण हा सण साजरा करणा-या महिलांच्या मानसिक गुलामगिरीची कीव करावीसी वाटते

    ReplyDelete